esakal | युरोपियन देशांमध्ये सात हजार टन शेतमालाची निर्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Export

पथदर्शी निर्यात सुविधा केंद्र
शेतमाल निर्यात सुविधा केंद्रे ही पणन मंडळाने राज्यात विविध भागात पथदर्शी स्वरूपात उभारली आहेत. या केंद्रातील तंत्रज्ञान व फायदे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, यांना पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या असल्याचे पणन मंडळाने सांगितले.

युरोपियन देशांमध्ये सात हजार टन शेतमालाची निर्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - राज्यातील पणन मंडळाच्या सुविधा केंद्रांवरून जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांत सुमारे ७१ कोटी रुपये किमतीचा ७६३७.९ मे. टन शेतमाल निर्यात करण्यात आला. नेदरलॅंड, अमेरिका, रशिया, थायलंड, इराण, मलेशिया, सिंगापूर, कॅनडा, जर्मनी, नेपाळ, जपान, ब्रिटन, आखाती देश, दुबई, श्रीलंका व युरोपियन देशांमध्ये हा माल पाठवण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सुविधा केंद्रावरून देशांतर्गत विक्रीसाठीही माल पाठवला जातो. त्यामध्ये कांदा, द्राक्ष, केळी, डाळिंब, गुलाब फुले, आंबा, चिकू, संत्रा, बेबी कॉर्न यांचा समावेश आहे. गत तीन महिन्यांत देशांतर्गत विक्रीसाठी सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपये किमतीचा ८६८.२२ टन शेतमाल मुंबई, गोवा, पुणे, दिल्ली, हैदराबाद, रत्नागिरी व फलटण आदी ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती पणन मंडळाकडून देण्यात आली. तीन महिन्यांमध्ये सुविधा केंद्रावर एकूण ११७३ जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला.

ज्येष्ठांनो, अशी घ्या काळजी....

निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, व्यापारी, वैयक्तिक शेतकरी यांनी त्यांच्या कृषिमालाची निर्यात तसेच देशांतर्गत विक्रीकरिता या सुविधा केंद्रांचा वापर करावा.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

loading image