पिंपरीमधील मोहन नगरमध्ये वाहनांची तोडफोड

संदीप घिसे
शुक्रवार, 13 जुलै 2018

पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील मोहननगर परिसरात शुक्रवारी पहाटे तीन जणांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड केली.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजताच्या सुमारास हातात कोयते घेऊन तीन जण आरडाओरडा करीत आले. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या सात वाहनांची तोडफोड केली. आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना झाले आहे.

Web Title: Seven vehicles destroyed by three people in chinchwad