हत्यार बाळगल्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या सात तरुणांना पुन्हा अटक | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

criminal arrested
हत्यार बाळगल्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या सात तरुणांना पुन्हा अटक

हत्यार बाळगल्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या सात तरुणांना पुन्हा अटक

वाघोली - खुनाच्या आरोपात अटक होऊन जामिनावर बाहेर आलेल्या सात तरुणांना हत्यार बाळगल्याप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट सहाने ही कारवाई केली.

लोणीकंद येथील संतोष शिंदे खून प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये हा खून झाला होता. ते सर्व जण सध्या जामिनावर बाहेर होते. मात्र ते आपल्या सोबत घातक हत्यारे बाळगत असल्याची माहिती युनिट सहाचे पोलीस कर्मचारी ऋषीकेश ताकवणे व ऋषीकेश व्यवहारे याना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. शिवाजीनगर न्यायालय परिसरात त्यांना त्याब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्या कडे पिस्तूल, एक जिवंत काडतुस, दोन कोयते, दोन लाकडी दांडके आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: वेळीच मदतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला मिळाले उपचार

प्रथमेश उर्फ सनी शिंदे, गणेश दाते, ऋतिक शिवले, रोहित मंजुळे, रोहित डफळ, आकाश दंडगुले, मनोज साळवे असे अटक केलेल्यांची नावे आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदाराना ते हत्यारांचा धाक दाखवत दहशत निर्माण करीत होते. अशी माहिती पोलिसानी दिली. गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुधीर टेंगले, एम वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, शेखर काटे, नितीन शिंदे, प्रतीक लाहीगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, सलीम तांबोळी यांनी ही कामगिरी केली.

loading image
go to top