चाकणला एटीएम फोडून सतरा लाख लांबविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

चाकण (पुणे) ः चाकण-शिक्रापूर मार्गावरील चाकण (ता. खेड) येथील चंद्रश्री कॉम्प्लेक्‍समधील एचडीएफसी बॅंकेचे एटीएम शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. त्यातील सुमारे सतरा लाखांची रोख रक्कम लांबविली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली.

बॅंकेचे अधिकारी नवनाथ कणसे यांनी पोलिसात तक्रार दिली. स्कॉर्पिओ मोटारीतून दोन ते तीन चोरटे आले होते, त्यांनी तोंडावर रुमाल बांधला होता. प्रथम त्यांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर निळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर स्कॉर्पिओ मोटारीने एटीएम मशिन दोर लावून बाहेर ओढले. या इमारतीमधील एकाला आवाज आल्याने त्याने बाहेर पाहिले असता त्यांना चोरटे एटीएम फोडत असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस येईपर्यंत रोकड घेऊन चोरटे पसार झाला होते. पोलिसांनी रविवारी सकाळी पुन्हा घटनास्थळी जाऊन सीसीटीव्हीतील चित्रण तपासले असता, वरील महिती मिळाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventeen lakh stolen from Atm machine at chakan