

Phugewadi Tragedy: Official Records Show 11 Deaths, Ground Reality Reveals 16
sakal
पिंपरी/पिंपळे गुरव : फुगेवाडीत विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, या दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्ती खरोखरच प्रशासनाच्या नोंदीत आले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारपर्यंत १६ जणांचे मृत्यू झाले असताना पोलिसांकडे अकरा जणांचीच नोंद आहे.