

A massive 450 kg Megadambari installed over the Samadhi of Shahaji Raje Bhosale in Hodigere, Davanagere, protecting the historic site from weather damage.
esakal
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील दावणगेरे येथील समाधीस्थळावर भव्य मेघडंबरी उभारण्यात आली आहे. ही मेघडंबरी तब्बल ४५० किलो वजनाची असून, समाधीला संरक्षण कवच मिळाले आहे.हे ऐतिहासिक कार्य पुण्यातील प्रसिद्ध मल्हार भक्त आणि इतिहासप्रेमी डॉ. गौरव भाऊ घोडे यांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चाने पूर्ण झाले आहे. पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.