शाहिरी सादरीकरणाने दुमदुमली साहित्यपंढरी

महाराष्ट्र साहित्य परिषद - ‘साहित्यिकांची शाहिरी’ कार्यक्रमात सादरीकरण करताना शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांचे सहकारी.
महाराष्ट्र साहित्य परिषद - ‘साहित्यिकांची शाहिरी’ कार्यक्रमात सादरीकरण करताना शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांचे सहकारी.

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, वसंत बापट या कवींनी लिहिलेल्या शाहिरी काव्यांच्या सादरीकरणाने साहित्यपंढरी दुमदुमली. निमित्त होते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिकांची शाहिरी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांचे सहकारी प्रा. संगीता मावळे, महादेव जाधव, होनराजराजे मावळे, मुकुंद कोंडे आदींनी पोवाडे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे आदी या वेळी उपस्थित होते. 

प्रा. जोशी म्हणाले, ‘‘मराठी साहित्यातील काव्यगंगा ही संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य या तीन पात्रामतून वाहते. संतकाव्याने समाजाला प्रबोधनाचा प्रकाश दाखविला. पंतकाव्याने अभिजनांसाठी साहित्यनिर्मिती केली, तर तंतकाव्याने एकीकडे शाहिरीच्या माध्यमातून शौर्याचे गुणगान केले, तर दुसरीकडे लावणीच्या माध्यमातून सौंदर्याचे गुणगान केले. शाहिरी काव्याने मराठी काव्याला दिलेले योगदान खूप मोलाचे आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com