Vidhan Sabha 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादीला आराम करू द्या : शहनवाज हुसेन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

योगेश टिळेकर यांनी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केले आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद द्या आणि मताधिक्क्याने निवडून आणा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांनी केले.

मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केले आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद द्या आणि मताधिक्क्याने निवडून आणा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांनी केले.

Vidhan Sabha 2019 : माझ्यापेक्षा कोथरूडकरांचा विजय महत्त्वाचा : शिंदे

भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी शहानवाज हुसेन कोंढवा येथे आले होते. त्यावेळी मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते.

हज समितीचे संचालक इमरान मुजावर, कार्यकर्ते मुस्तफा पटेल, इम्तियाज मोमिन, फिरोज मुलाणी, पनवेलचे उपमहापौर विक्रांत पाटील, निजाम शेख, रियाज शेख, इसाक पानसरे, मुसा इनामदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahnawaz Hussain criticizes Congress And NCP