Vidhan Sabha 2019 : माझ्यापेक्षा कोथरूडकरांचा विजय महत्त्वाचा : शिंदे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

माझ्या विजयापेक्षा कोथरूडकर नागरिकांचा विजय महत्त्वाचा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केले.

पुणे : विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून कोथरूडमधील स्थानिक कोथरूडकर उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. तशी मतदारसंघातील नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे माझ्या विजयापेक्षा कोथरूडकर नागरिकांचा विजय महत्त्वाचा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केले.

Vidhan Sabha 2019 : आम्ही बोललो, तर महागात पडेल - चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. तेव्हा शिंदे म्हणाले, "भाजपने कोथरूकर नागरिकांवर बाहेरचा उमेदवार लादला आहे. भाजपच्या उमेदवाराचा आणि कोथरूडचा काडीमात्र संबंध नाही. त्यांनी मतदारसंघासाठी काहीही कामे केलेली नाहीत. त्यामुळे त्यांना कोथरूडकर सजग नागरिक आहे. त्यामुळे माझ्या विजयापेक्षा कोथरूकरांचा विजय महत्त्वाचा आहे.'' तसेच भाजपच्या लोकांनी चंद्रकांत पाटील हे एक लाख मतांनी विजयी होतील, असे सांगितले जात आहे. मात्र, माझा विजय हा एक लाख एक मतांनी होईल, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मुळशी भागातील नागरिक देखील माझ्या पाठीशी उभे राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Vidhan Sabha 2019 : प्रचाराला या, दीड हजार घ्या!

दरम्यान, शुक्रवारी (ता.18) शिंदे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभा कोथरूडमध्ये होणार आहे. तसेच शिंदे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनीही पाठिंबा दिलेला आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीतील नाराजांकडून शिंदे यांना मदत होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: victory of citizens of kothrud is more important says MNS contestant Kishor Shinde