शिवसेनेच्या शैला खंडागळे यांची बाजी

शिवसेनेच्या शैला खंडागळे यांची बाजी

देहू - जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत १२० मतदारांनी नोटाचा वापर केला. विजयानंतर खंडागळे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली.

शैला खंडागळे यांना ४११७ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार मच्छिंद्र चव्हाण यांना २९५७ तर काँग्रेसचे रूपेश चव्हाण यांना १०४० मते मिळाली. देहू लोहगाव गटासाठी शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार बाळा भेगडे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादीचे नेतेही देहूत तळ ठोकून होते. राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनीही देहूचा दोन वेळा दौरा केला. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची ठरली.या विजयाबाबत शिवसेनेचे देहू शहरप्रमुख सुनील हगवणे म्हणाले, ‘‘भाजप आणि शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजय खेचून आणला आहे.’’

राष्ट्रवादीने या गटात मंगल जंगम यांना उमेदवारी दिली होती. माझा १४ मतांनी पराभव झाला होता. निवडणूक आयोगाने जंगम यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यासाठी पाठपुरावा केला. 
- शैला खंडागळे, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com