शनिवारवाड्याची स्वच्छता क्रिएटिव्ह फाउंडेशनला देण्याची मागणी !

शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता पुरातत्त्व खात्यास जमत नसले तर क्रिएटिव्ह फाउंडेशनला द्या
Shaniwar Wada cleaning to Creative Foundation Archaeological Department Gajanan Mandavare pune
Shaniwar Wada cleaning to Creative Foundation Archaeological Department Gajanan Mandavare pune sakal

पुणे : केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून शनिवारवाड्याची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता केली जात नाही व दुसऱ्यांना करूनही दिली जात नाही. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूमध्ये कचऱ्याचे व असुविधांचे साम्राज्य आहे. पुरातत्त्व खात्यास जमत नसले तर स्वच्छता करण्याची परवानगी आम्हाला द्यावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनने पुरातत्त्व विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे यांच्याकडे केली आहे.

शनिवारवाड्यात जाण्यासाठी २५ रुपये शुल्क घेतले जात आहे. पण शनिवारवाड्यातील सर्व माहिती फलक पुसट झाले आहेत. कारंज्यात घाण साचली आहे, वाहने लावण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने नागरिकांचे वाद होत आहेत व सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेत आहेत. शनिवारवाड्यातील लाइट अँड साउंड शो बंद आहे तो सुरू करावा अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

शनिवारवाड्यात छोटी कामे केल्यास तेथील स्वच्छता होऊ शकते, पण आम्ही काही करणार नाही आणि कोणाला काही करू देणार नाही अशी भूमिका आपल्या खात्याची आहे. आमच्या संस्थेला स्वच्छतेसाठी परवागनी द्यावी आम्ही शनिवारवाड्याचे पावित्र्य राखू अशी मागणी खर्डेकर यांनी पुरातत्त्व खात्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com