esakal | #Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र
sakal

बोलून बातमी शोधा

Shaniwarwada

गर्दुल्यांचाही वावर
शनिवारवाड्याच्या परिसरात उभ्या केलेल्या वाहनांमध्ये काही चालक मद्यपान करताना दिसून येत आहेत. आतमध्ये बुरुजांच्या भिंतीवर प्रेमीयुगुल बसलेली असतात. या भागात गर्दुल्यांचाही वावर असल्याची पर्यटकांची तक्रार आहे.

#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता केली जात नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारवाड्याच्या भिंतीलगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. फुटक्‍या बुरजाच्या बाजूला पदपथावर अस्वच्छता पसरली आहे. या भागात वाहतूक पोलिसांनी पूर्वी ‘नो पार्किंग’ झोन केले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली होती. मात्र आता परिसरात सर्रास वाहने उभी केली जातात. 

विद्यार्थ्यांनो, All The Best; दहावीची परीक्षा उद्यापासून

याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, पदपथ हा महापालिकेच्या अखत्यारीत आहे, तर भिंतीलगतची जागा ही पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे रस्ता आणि पदपथाची स्वच्छता महापालिकेकडून करण्यात येते. पुरातत्त्व विभागाला याबाबत विचारले असता पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 

'ते' दोघे पीएमपी प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरायचे अन् आता..

शनिवारवाड्याच्या भोवतालचा रस्ता आणि पदपथांची नियमितपणे स्वच्छता केली जाते. मात्र अस्वच्छता असल्यास संबंधितांना पुन्हा सूचना देण्यात येतील. भिंतीलगतचा परिसर भारतीय पुरातत्त्व विभागाचा असला, तरी शक्‍य होईल तेवढी स्वच्छता राखली जाईल. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, सहायक आयुक्त, पुणे, महापालिका

शनिवारवाड्याच्या बाहेरच नाही, तर आतमध्येदेखील अस्वच्छता पसरली आहे. २५ रुपयांचे तिकीट काढून आमची मोठी निराशा झाली.  
- काका मारकड, पर्यटक

शनिवारवाडा पहिल्यांदाच पाहिला, पण आतमध्ये खूप विचित्र स्थिती दिसून आली. युगुलांचे चाळे बघवत नाही अन्‌ गर्दुलेही गांजा ओढत असताना दिसून आले. वाड्याच्या आत सुरक्षारक्षक काय करतात, हा खरा प्रश्‍न आहे.
- पूजा झोळे, पर्यटक

loading image