esakal | 'ते' दोघे पीएमपी प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरायचे अन् आता..
sakal

बोलून बातमी शोधा

Two burglars arrested for stealing valuables of PMP passengers

पोलिस उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यावेळी पीएमपीमध्ये चोऱ्या करणारा आरोपी हा खराडी बायपास चौक येथे थांबला असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कृष्णा जाधव यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीचा मोबाईल आढळला.

'ते' दोघे पीएमपी प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरायचे अन् आता..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या दोन चोरट्यांना विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संबंधीत आरोपींनी आणखी काही गुन्हे केल्याची माहिती पोलिस चौकशीत पुढे आली आहे. 

पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण

गणेश सिद्राम गायकवाड (वय 34), कृष्णा मारूती जाधव (वय 28,दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी धीरज चंद्रकांत शिंदे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी 29 फेब्रुवारी रोजी पीएमपी बसमधून पाचवा मैल ते विमाननगर असा प्रवास करीत होते. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत शिंदे यांच्या खिशातील मोबाईल चोरुन नेला होता.

पुणे : पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्याचे वादग्रस्त पोस्टर उतरवले 

पोलिस उपनिरीक्षक ए. डी. पिंगळे या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यावेळी पीएमपीमध्ये चोऱ्या करणारा आरोपी हा खराडी बायपास चौक येथे थांबला असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कृष्णा जाधव यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीचा मोबाईल आढळला. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गायकवाडच्या मदतीने बसमधील प्रवाशांचे मौल्यवान ऐवज चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गायकवाड यालाही ताब्यात घेतले. गायकवाड याच्याककडे चौकशी केल्यानंतर त्याने खराडी बायपास ते टाटा गार्डन दरम्यान, एका प्रवाशाचे 18 हजार 500 रुपये चोरल्याची कबुली दिली.
 

 विद्यार्थ्यांनो, All The Best; दहावीची परीक्षा उद्यापासून

loading image
go to top