विकासकामांचा ध्यास घेतलेला प्रेमळ आमदार

विकासकामांचा ध्यास घेतलेला 
प्रेमळ आमदार
Published on

विकासकामांचा ध्यास घेतलेला
प्रेमळ आमदार

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विकासकामांबरोबर मतदारसंघातील नागरिकांशी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे प्रेम करणारा प्रेमळ माणूस म्हणजे आमदार शंकरभाऊ मांडेकर. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते जनतेची सेवा करीत आहेत. भोर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी दिवसरात्र काम करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.

- प्रवीण जगदाळे,
जिल्हा परिषद सदस्य, भोर

आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचे आणि आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध हे गेल्या १५ वर्षांपासून आहेत. शंकरभाऊंचा कामाचा आवाका, स्पष्टपणा, निःस्वार्थी स्वभाव, इतरांच्या कामाचे श्रेय न घेण्याचा विचार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेणारे आमदार म्हणून ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची तळमळ मी अनुभवली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची आम्हाला खूप मदत झाली आहे. माझ्या जिल्हा परिषदेच्या विजयात राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार शंकरभाऊंचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही निवडणुकीत केलेली व्यूहरचना ही माझ्यासाठी मोलाचा दगड ठरला आहे.
कित्येक वर्षांपासून भोर तालुक्यातील अपूर्ण प्रश्न व विकासकामे सोडविण्यासाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांची धडपड सुरु आहे. भोर तालुक्यातील एमआयडीसी, भोर शहराचा पाणीप्रश्न, उपजिल्हा रुग्णालयातील खाटांच्या संख्येत वाढ करणे आणि कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी त्यांचे सुरु असलेले प्रयत्न मी पहात आहे. तालुक्यातील शासकीय व ग्रामपंचायतीच्या इमारती, स्मशानभूमी शेड, अंतर्गत रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे विस्तारीकरण व देखभाल, शाळा वर्गखोल्या, पाणीपुरवठा योजना इत्यादी कामे त्यांच्या माध्यमातून सुरु आहेत. भोर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घरातील धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमांना ते धावपळीत का होईना उपस्थित रहात आहेत. दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन कामाची सुरुवात करणारा पहिला आमदार मी पाहिला आहे.
भौगोलिक दृष्टीने वेगळ्या असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात ते सकाळी मुळशी, दुपारी भोर आणि सायंकाळी राजगड (वेल्हे) अशा प्रकारे धावपळ करीत आहेत. सामान्य कार्यकर्त्याचे फोनदेखील ते उचलून त्यांच्या अडचणी सोडवित आहेत. भोर तालुक्यातील विकासकामांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यांची तळमळ आणि निधी आणण्याचे प्रयत्न पाहता हा निधी ते नक्कीच देतील, असा मला विश्वास आहे. एक आमदार पाच वर्षात काय करू शकतो, हे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकाळात जनतेला नक्कीच समजणार आहे. शंकरभाऊ आपल्या विकास कामांमधून विरोधकांना चोख उत्तर देत आहेत.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यावर्षी ते वाढदिवस साजरा करणार नाहीत. परंतु भोरमध्ये महाआरोग्य शिबीर घेण्यासाठी त्यांनी होकार दिला. यामुळे अजितदादांच्या जयंतीनिमित्त व शंकरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भोरमध्ये महाआरोग्य शिबीर घेतले आणि एक हजारापेक्षा जास्त रुग्णांना लाभ दिला. जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना आम्हाला ते नेहमी विकासकामांसाठी प्रस्ताव द्या मी निधीची व्यवस्था करतो. असे सांगत आहेत.
निस्वार्थी, कार्यकर्त्यांची कदर करणारा, प्रेमळ मनाचा कामाचा आमदार असलेले शंकरभाऊ मांडेकर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com