Sharad Mohol : अभिजित मानकरने आरोपींना सिमकार्ड आणि रोकड दिली; तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात माहिती

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील आरोपींना खेड शिवापूर परिसरात अभिजित मानकर याने सिमकार्ड आणि रोकड आणून दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Sharad Mohol Murder Case
Sharad Mohol Murder Case sakal

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील आरोपींना खेड शिवापूर परिसरात अभिजित मानकर याने सिमकार्ड आणि रोकड आणून दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्ह्याच्या कटाच्या अनुषंगाने मानकर याचे आरोपींसोबतचे झालेल्या फोनचे रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

मोहोळचा खून झाला तेव्हा घटनास्थळी आलेले आरोपी आणि आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात असणारा अभिजित अरुण मानकर (३१, रा. दत्तवाडी) याला गुन्हे शाखेने अटक करून बुधवारी (ता. ७) न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात आत्तापर्यंत मानकरसह १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे क्लोन करण्यात आले असून, त्यात १९ हजार ८२७ ऑडिओ क्लिप, रेकॉर्डिंग मिळाले आहे. यातील १० हजार क्लिपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. त्यात मानकर याचेही आरोपींबरोबरचे संभाषण समोर आले आहे. मानकर याच्या आवाजाचे नमुने लॅबला पाठवायचे आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढची साखळी समोर येण्याची शक्यता आहे, असे तांबे यांनी न्यायालयाला सांगितले.

आरोपीचा गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न झाला आहे. त्याच्या आवाजाची चाचणी अद्याप बाकी आहे. त्यासाठी आरोपाच्या पोलिस कोठडीची आवश्यक आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

मानकरला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी -

मानकरच्या आवाजाचे नमुने फाँरेन्सिक लॅबला पाठवायचे आहेत. त्यामुळे मानकर याला पोलिस कोठडी देण्याची मागणी तांबे यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश (मोक्का) व्ही. आर. कचरे यांनी मानकरला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com