Sharad Pawar addressing NCP supporters during the 26th foundation day rally in Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने शरद पवार गटातर्फे पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.