NCP : आम्ही एकत्रच ! पुण्यात एकाच फ्लेक्सवर झळकले शरद पवार, अजित पवार अन् सुप्रिया सुळेंचे फोटो, राज्यात चर्चेला उधाण

NCP News : पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी करण गायकवाड यांच्या फ्लेक्सची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांनी फ्लेक्सवर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे फोटो लावले आहेत. कुटूंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत अशा आशयाचा मजकूर त्यावर आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule featured together on a viral Pune flex with the message “Aamhi Ekatrach,” igniting statewide political discussion.

Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule featured together on a viral Pune flex with the message “Aamhi Ekatrach,” igniting statewide political discussion.

esakal

Updated on

Summary

पुण्यात "आम्ही एकत्रच" या मजकुरासह शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फ्लेक्स लागल्याने राज्यभर चर्चा रंगली.

फ्लेक्समधून वेगळे विचार असूनही कुटुंब एकत्र असल्याचा संदेश दिला गेला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या फ्लेक्सला विशेष राजकीय महत्त्व मिळाले आहे.

पुण्यात सध्या एक बॅनर झळकले आहे मात्र याची चर्चा राज्यभर सुरु झाली आहे. या फ्लेक्सवर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आहेत शिवाय वरील मजकूर ही सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. आम्ही एकत्रच असे या फ्लेक्सवर लिहिण्यात आले आहे. हे फ्लेक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राज्यभरात या फ्लेक्सची चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com