पवार साहेबांचे विशेष प्रेम माने दादांवर - खा. सुप्रिया सुळे

राजकुमार थोरात
बुधवार, 2 मे 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये पवार साहेबांचे विशेष प्रेम कोणावरती असलेतर...ते माने दादांवरती... हे शब्द खासदार सुप्रिया सुळे यांचे...

अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी नुकताच शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसहित राष्ट्रवादी काॅग्रेसच्या दिग्गज मंडळीनी हजेरी लावली होती.

मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या भाषणाने मेळाव्याला सुरवात झाली. भाषणामध्ये सुळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या काॅग्रेस पक्षाने गेल्या दहा वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यामुळे विकासाच्या जोरावर आमदार दत्तात्रेय भरणे निवडून आले असुन भरणे मामांनी विकासचा झपाटा लावला असून मामांचे कौतुक केले.

तालुक्यामध्ये सोनाई परिवारचे अध्यक्ष दशरथ माने यांनी शुन्यातुन सोनाईची निर्मिती केली असल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन माने दादांवरती पवार साहेबांचे विशेष प्रेम आहेे. दिल्लीमध्ये बैठक असल्यानंतर अधिकारी माने दादा को कहा है...उनको सब पता है... असे अधिकारी  सांगत असतात. ते दुधाचा व्यवसाय उत्तम करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,वैशाली पाटील यांनी ही दोन कोटी पेक्षा जास्त निधी खेचून आण्याबद्दल त्यांचे आभार मानून प्रदीप गारटकर,आप्पासाहेब जगदाळे यांचे ही कौतुक केले. इंदापूरकर नेहमी लोकसभेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारला झुकते माप देत असतात.मागील निवडणूकीमध्ये पवार साहेबांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील उमेदवार असताना देखील इंदापूरकरांनी पाच हजार मतांची आघाडी दिली असल्याची आठवण नागरिकांना दिली.

Web Title: sharad pawar and mane have goo bond said supriay sule