पवारांच्या फिरकी गोलंदाजीवर चकले पृथ्वीराज चव्हाण

pune
pune

पुणे : राजकीय पटलावरील आपल्या डावपेचांचा भल्याभल्यांना अंदाज येऊ न देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी फिरकी गोलंदाजी करीत, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना चकविले. विशेष म्हणजे, पवार यांनी टाकलेले दोनपैकी एकही चेंडू चव्हाण यांना टोलवता आला नाही. 

पवार- चव्हाण यांच्यातील हा सामना रंगला, तो पवार यांचे सासरे सदू शिंदे यांच्या स्मरणार्थ महापालिकेने तळजाई टेकडी येथे उभारलेल्या मैदानावर. या मैदानाचे उद्‌घाटन पवार आणि चव्हाण यांच्या हस्ते झाले, तेव्हा दोघांनी खेळी करूनच उद्‌घाटन करण्याचा आग्रह उपस्थितांनी धरला. तेव्हा पवार यांच्या हातात बॅट दिली; मात्र पवारांनी आपल्या हातातील बॅट चव्हाण यांच्याकडे देत, त्यांना फलंदाजीची संधी दिली अन्‌ स्वतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे या खेळपट्टीवरील पवार यांच्या गोलंदाजीकडे सर्वांचीच नजर रोखली गेली. राजकीय पटलाप्रमाणे पवारांनी फिरकी गोलंदाजी केली. पवार यांनी दोन फिरकी बॉल चव्हाण यांना टाकले. चव्हाण यांना ते नेमके खेळता आले नाहीत. या दोघांमधील खेळीनंतर चर्चा रंगली होती ती, चव्हाण हे सावधपणे खेळले, की पवारांनीही चव्हाणांची "विकेट' न घेता दोन्ही कॉंग्रेसमधील मैत्री कायम ठेवली याची. 

...त्यामुळेच घेतली गोलंदाजी 
सदू शिंदे यांना अतिशय उत्कृष्ट गुगली टाकता येत होती. त्यांची गुगली कोणालाही खेळता येत नसे. शरद पवार यांना क्रिकेटची चांगली जाण आहे. वातावरणाचा पिचवर काय परिणाम होतो, हे त्यांना माहीत आहे. स्पीच ओली असेल, तर ते गोलंदाजीसाठी उपयुक्त असते, त्यामुळे त्यांनी स्टेडियमच्या उद्‌घाटनावेळी गोलंदाजी घेतली, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com