esakal | शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या अधिकाऱ्याची घेतली खास भेट
sakal

बोलून बातमी शोधा

आग्रा (उत्तरप्रदेश) : खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आग्रा शहराचे पोलिस अधिक्षक रोहन बोत्रे.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील रोहन प्रमोद बोत्रे (आयपीएस) या मराठी तरुणाने उत्तर प्रदेशातील पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व त्याचे कुंटुबीय नुकतेच आग्रा शहराच्या भेटीवर गेले त्यांनी रोहन बोत्रे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी बोत्रे यांच्या कार्याचे कौतुक केले.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या अधिकाऱ्याची घेतली खास भेट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पारगाव - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील रोहन प्रमोद बोत्रे (आयपीएस) या मराठी तरुणाने उत्तर प्रदेशातील पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व त्याचे कुंटुबीय नुकतेच आग्रा शहराच्या भेटीवर गेले त्यांनी रोहन बोत्रे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी बोत्रे यांच्या कार्याचे कौतुक केले.

पवार व सुळे हे आग्रा शहराच्या भेटीवर असताना त्यांना स्थानिक खासदाराकडून बोत्रे यांच्या कार्याबाबत समजले. ते सध्या आग्रा शहर पोलिस दालात अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. बोत्रे हे महाराष्ट्रातील असल्याचे कळल्यानंतर पवार यांनी त्यांची आवर्जन भेट घेतली. त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोहन बोत्रे यांचे लहानपण अवसरी खुर्द येथे गेले. त्यांचे आई-वडिलांनी रयत शिक्षण संस्थेच्या पुण्यातील हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा केली आहे. ही माहिती पवार यांना कळल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.  उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बोत्रे यांचे प्रत्यक्ष कामातील अनुभव देखील या वेळी पवार यांनी जाणून घेतले. तेथील पोलिस प्रशासनात नव्याने राबवले जात असलेल्या उपक्रमांची माहिती पवार यांनी बोत्रे यांच्याकडून घेतली. 

राज्यात कोरोना लसीचे डोस खरंच पडून आहेत?; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

माजी खासदार विठ्ठल तुपे यांच्या निवडणूक प्रचारात वडील प्रा. प्रमोद बोत्रे यांच्याबरोबर सहभागी झाल्याची आठवण देखील बोत्रे यांनी पवार यांना सांगितली. कौटुंबिक वातावरणात चहापानाच्या या वेळी प्रतिभा पवार, रोहन बोत्रे यांच्या पत्नी डॉ. श्रुती बोत्रे उपस्थित होत्या.

सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

फेसबुकवर भेटीची माहिती 
शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी आग्रा भेटीदरम्यान मूळचे पुण्याचे व सध्या आग्रा शहरात पोलिस अधिक्षक पदावर कार्यरत असलेले रोहन बोत्रे यांची भेट झाल्याची माहिती छायाचित्रासह आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. यामुळे बोत्रे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top