शरद पवार यांनी केले भरणे कुंटूबाचे सांत्वन

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
Sharad Pawar and Dattatray Bharane
Sharad Pawar and Dattatray BharaneSakal
Summary

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

वालचंदनगर - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. जुन्या आठवणीला उजाळा देवून भरणेंच्या कामाचे कौतुकही केले.

माजी राज्यमंत्री भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे (वय ८३) यांचे शुक्रवारी (ता.१) रोजी निधन झाले. आज दुपारी राष्ट्रवादीचे नेत शरद पवार यांनी भरणे कुंटूबाला भेट देवून सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांनी अनेक जुन्या आठवणीला उजाळा दिला. इंदापूर तालुक्यासह बारामती तालुक्यामध्ये गुळाला चांगला दर मिळत होता. सध्या इंदापूरचे शेतकरी द्राक्षामधून चांगले उत्पन्न घेत आहेत.इंदापूरमध्ये शैक्षणीक सुविधा निर्माण झाल्याचे सांगितले.

पवारसाहेब भरणेवाडीला येताना कळस -जंक्शन मार्ग आले होते.येताना रस्त्यांची पूर्ण झालेली कामे पाहुन रस्त्यांची कामे कुणी मार्गी लावली याची चौकशी केल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, भरणेमामांनी तालुक्यातील सर्व रस्त्यांची सर्व कामे मार्गी लावली असून वाड्यावस्तीवरील रस्ते झाल्याचे सांगितले. यानंतर पवार साहेबांनी भरणेमामांचे कौतुक करुन मुख्यमंत्री कुणीही असले तरी मतदार संघामध्ये सर्वाधिक निधी नेणारा आमदार अशी त्यांची राज्यात ओळख आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जास्त निधी आणला होता असल्याचे सांगून भरणे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यानंतर कामे सांगायला कमी पडतील ते भरणे कसले...भरणे यांनी लगेच इंदापूर तालुका टेलला असून खडकवसाल्याचे पाणी कमी पडत आहे. मुळशीच्या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. व शिल्लक पाणी इंदापूरला देण्याची मागणी पवारसाहेबांकडे केली. यावेळी पवार साहेबांनी नेचर डेअरीच्या दुध संकलन व उत्पादनाची माहिती घेतली.

यावेळी विठ्ठल मणीयार, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक बाळासाहेब पाटील, लक्ष्मण शिंगाडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले, विक्रम निंबाळकर उपस्थित होते. आज दिवसभरामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अनेकांनी भरणे यांची भेट घेवून सांत्वन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com