

Sharad Pawar hospitalised Ruby Hall Clinic doctors share health bulletin
Esakal
Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दगदगीमुळे प्रकृतीचा किरकोळ त्रास झाला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सोमवारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. वरिष्ठ फिजिशियन डॉ. अभिजित लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.