Sharad Pawar : राजकिय मतभेद विसरत पवारसाहेबांनी घेतली चंद्रराव तावरे यांची भेट

भाजपचे नेते व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची सांगवी (ता. बारामती) येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट घेतली.
sharad pawar meet to chandrarao taware
sharad pawar meet to chandrarao tawaresakal

माळेगाव - भाजपचे नेते व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची सांगवी (ता. बारामती) येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट घेतली. तावरे भाजपचे जरी नेते असले तरी ते शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. तब्बल पंधरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या दोन्ही नेत्यांची दरवाजाआड पंधार मिनिटे चर्चा झाली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, अॅड.एस.एन जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होत. या चर्चेचा वृत्तांत जरी पुढे आला नसला तरी लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना मदत होण्याच्या दृष्टीने पवार-तावरे यांची भेट महत्वाची मानली जाते.

विशेषतः तावरे यांनी याआगोदर पुरंदर, इंदापूर तालुक्याप्रमाणे बारामतीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही म्हणणे ऐकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्वतंत्र वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु फडणविस व तावरे यांची भेट होण्यापुर्वीच शरद पवार यांनी आपले राजकिय मतभेद विसरत तावरे यांची भेट घेतली. परिणामी तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सांगवी येथे ज्येष्ठ विधीतज्ञ कै. आर. ए. जगताप, लक्ष्मी सहकार संकूलचे संस्थापक कै. भिकोबा तावरे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्या कुटुंबियांना सात्वन करण्यासाठी शरद पवार सांगवीत आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होत.

याबाबत चंद्रराव तावरे म्हणाले,' ही कोणतीही राजकिय भेट नव्हती. सांगवीत पवारसाहेब इतर कामानिमित्ताने आले असता ते माझ्या घरी आले. एकमेकांच्या तंबेतीबाबत चर्चा झाली. कौटुंबिक विचारपुस झाली. सरबत घेतला आणि पवारसाहेब गेले. यापेक्षा वेगळी चर्चा झाली नाही,` असे त्यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com