Sharad Pawar : पवारसाहेबांनी अखेर बारामतीकरांपुढे सोडले मौन; अनेक राजकीय बाबींचा केला उलगडा

केंद्र व राज्यात मी पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत आणि विरोधात होतो. सुप्रिया तीन वेळा खासदार झाली.
sharad pawar open up on political strategy election baramati supriya sule maharashtra politics
sharad pawar open up on political strategy election baramati supriya sule maharashtra politicsSakal

माळेगाव : केंद्र व राज्यात मी पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत आणि विरोधात होतो. सुप्रिया तीन वेळा खासदार झाली. उत्कृष्ठ संसद पंटू पुरस्काराने ती सन्मानित झाली. तिच्याकडे कर्तुत्व आणि नेतृत्व आहे.

असे असताना मी स्वतः हिंगोलीच्या सुर्य़कांता पाटील, माझे सहकारी पी ए संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढे आणले. इतरांना सत्तेत मोठमोठी जबाबदी दिली. मात्र माझ्या मुलीला (सुप्रिया ) बाजूला ठेवले.

ऐवढ करूनही राष्ट्रवादी पक्षाला सोडून अनेक लोक बाजूला गेले, ते जनतेला आवडले नाही. हारकत नाही, मला खात्री आहे महाराष्ट्रातील जनता आशा लोकांना मतपेठीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,

अशा परखड शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याचे नाव न घेला पक्ष सोडणाऱ्या लोकांना फटकारले. आजवर मिळालेली सामुदायक शक्ती महाराष्ट्राच्या हितासाठी वापरली, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.

जिल्ह्यात आणि बारामतीत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे काम मजबूत उभे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी कृती आराखडा तयार केला आहे. त्या पार्श्वभूमिवर बारामतीच्या कार्य़कर्त्यांची महत्वपुर्ण बैठक आज गोविंद बाग येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या प्रसंगी पवार कार्य़कर्त्यांशी बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष अॅड.एस.एन.जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे, शहराध्यक्ष संदीप गुजर, ज्येष्ठ नेत सुभाष ढोले, अॅ़ड. राजेंद्र काटे, कार्याध्यक्ष गौरव जाधव यांच्यासह बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती,

दूध संघ आदी संस्थांचे माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव हिरवे, भगतसिंग जगताप, शरद तुपे आदी पदाधिकाऱ्यांनी पवारसाहेबांच्या भूमिकेला जाहिर पाटींबा दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी का्ॅग्रेस पार्टीच्या फुटीनंतर प्रथमच पवारसाहेबांनी गुरुवारी बारामतीमधील कार्य़कर्त्यांच्या समोर निर्णायक भूमिका मांडली. सुप्रिया सुळेंकडे कर्तुत्व आणि नेतृत्व असतानाही तिला सत्तेपासून बाजूला ठेवले आणि इतरांना मात्र मोठमोठी संधी दिली.

तरीही ते आपल्यापासून बाजूला गेल्याचे सांगत पवार यांनी प्रथमच अजित पवार यांचे नाव न घेता बारामतीत कार्य़कर्त्यांपुढे जाहिर नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थितांच्या चांगल्याच भुवया उंचविल्या. बारामतीत पदाधिकाऱ्यांची संख्या दोनशे आणि तालुक्याची लोकसंख्या पाच लाख आहे.

तशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागे जनता नाही, तर आपल्या विचाराशी असंख्य लोक जोडलेले आहे, असे सांगून पवार म्हणाले,`` जे लोक आपल्यापासून बाजूला गेले आहेत, ते मनानी नाही तर भिती पोटी, सत्तेतील पदासाठी गेलेली आहेत. त्यापैकी अनेकजण बारामती वगळता शहराच्या ठिकाणी येऊन आम्हाला भेटतात आणि सांगतात की आम्ही योग्यवेळी तुमच्याबरोबर येतो.

ठिक आहे. जे गेले त्यांचा विचार करू नका. अंतुले मुख्यमंत्री होते, तेव्हा ७० आमदारांपैकी ६२ आमदार मला सोडून गेले होते. पुढच्या निवडणूकीत सोडून गेलेले ५८ आमदार लोकांनी पाडले होते आणि त्यांच्या जागी अत्यंत सामन्य कार्यकर्ते आमदार झाले. तीच स्थिती आगामी निवडणूकांमध्ये पहावयास मिळेल,`` असा विश्वास व्यक्त करीत पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बळ दिले.

पवारांच्या कार्य़कर्त्यांना सूचना...

बारामतीसह महाराष्ट्रात यापुढे खासदार,आमदारकीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी संस्थांच्या निवडणूका लढविणार आहोत. त्याची रणनिती एकत्र बसून त्यात्यावेळी ठरवू, परंतु आता लोकसभेची निवड़णूक जवळ आली आहे.

या निवडणूकीत लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जाबाबदारी तुम्ही कार्य़कर्त्यांनी प्रमाणिकपणे स्वीकारा. पक्षाचे पदाधिकारी रात्रंदिवस काम कऱण्यास तयार आहे. तुमची साथ मिळाली, तर महाराष्ट्रात परिवर्तन घडवू. हे करीत असताना कोणावरही वैयक्तीक टिका न करता आपले काम करा, असा सल्ला पवार यांनी यावेळी कार्य़कर्त्यांना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com