संजय राऊत बोलले तरी मीच पक्षाचा अध्यक्ष : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

शरद पवार हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर होते. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून, त्यानिमित्त त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे जरी म्हणत असले, की अजित पवार आमच्या सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत. पण, शरद पवार यांनी अजून मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याची मिश्किल टिपण्णी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर होते. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून, त्यानिमित्त त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मंत्रिमंडळ विस्तार याबाबत चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी आज (शनिवार) झालेल्या पत्रकार परिषद सांगितले.

कॅग अहवालाबाबत चौकशी करावी आणि वस्तुस्थिती मांडावी : पवार

शरद पवार म्हणाले, की तीन पक्षांमध्ये खातेवाटप झाले आहे. दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. याबाबतची यादी माझ्याकडे असून, सर्वकाही ठरले आहे. संजय राऊत उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलत असले तरी मीच अजून अध्यक्ष आहे.

पुणे पोलिसांकडून सत्तेचा गैरवापर, एसआयटीमार्फत चौकशी करा : शरद पवार

राज ठाकरेंना टोला
महाविकास आघाडी म्हणजे जनतेशी प्रतारणा आहे, हे सरकार फार काळ टिकणार नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. याविषयी बोलताना पवार म्हणाले, की सरकार येऊन काहीच दिवस झाले तर लगेच निष्कर्ष काढायला लागले. कदाचित त्यांना पुढची फार काळजी आहे असं दिसतेय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar speaks about Shivsena MP Sanjay Raut in Pune