

Ajit Pawar Wish Should Be Fulfilled Says Sharad Pawar
Esakal
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आज सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या सगळ्या गोष्टींबाबत आपण अनभिज्ञ असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याचं शरद पवार म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा चार महिन्यांपासून सुरू असल्याचं आणि १२ तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती असंही शरद पवार यांनी सांगितलं.