
Sharad Pawar: ‘Strong Constitution is India's Backbone
Sakal
पुणे : ‘‘भारताच्या शेजारील देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा काळात भारत एकसंध असून, प्रगतीच्या पथावर आहे. भारताला एकसंध ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना व त्यातील लोकशाही मूल्यांमुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य सर्वांनी एकत्रित येऊन केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केले.