शारदाकाकी, तुम्ही कधीही हाक द्या. मी तुमच्यासोबत : रोहित पाटील

संपत मोरे
Monday, 27 January 2020

"शारदाकाकी,तुम्ही संकटावर मात करत घर सावरत आहात याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही कधीही हाक द्या. मी तुमच्या सोबत आहे."असे उद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी काढले.

पुणे- "शारदाकाकी,तुम्ही संकटावर मात करत घर सावरत आहात याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही कधीही हाक द्या. मी तुमच्या सोबत आहे."असे उद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी काढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी या गावात शहीद जवान राहुल करांडे यांच्या घरासमोर आज ध्वजारोहण करण्यात आले. रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून 'बावन्न सेकंद जवानांसाठी 'या उपक्रम राबविण्यात आला, यावेळी करांडे यांच्या आई आणि पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा

यावेळी रोहित पाटील म्हणाले,"आपले राष्ट्रगीत बावन्न   सेकंदाचे आहे तेवढा वेळ शहीद जवानांच्या सन्मानार्थ त्यांच्या दारात जाऊन प्रजासत्ताक दिन करण्याची कल्पना आमच्या मित्रांनी मांडली. आम्ही आज देशासाठी वीरमरण पत्करलेल्या करांडे यांच्या सन्मानार्थ इथं आलो आहे.आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत."

विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं 

यावेळी पाटील यांनी करांडे यांच्या मातोश्री शारदा यांना उद्देशून"शारदा काकी तुम्ही कधीही हाक मारा.हा रोहित तुमच्यासोबत आहे."असे सांगितले. "शारदाकाकी यांचे पती सैन्यात होते.दोन मुले सैन्यात आहेत.त्यातील एक शहीद झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर घर चालवताना किती अडचणी येतात हे मी जवळून पहातोय.आमच्या वयाच्या तरुण मुलांना शारदा काकी यांच्यासारख्या खंबीर आईंचा अभिमान वाटतो."असे पाटील म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shardakaki anytime I am with you says Rohit R R Patil