

online fraud
पुणे - शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा नफा आणि घरबसल्या ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील पाच जणांना सुमारे ६६ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी विश्रामबाग, विश्रांतवाडी, चतुःशृंगी, येवलेवाडी आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.