मोठी बातमी! हिंदूविरोधी वक्तव्य करणारा शरजिल उस्मानी अखेर पोलिसांपुढे हजर

sharjeel usmani
sharjeel usmani

पुणे : एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याने बुधवारी दुपारच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. एल्गार परिषदेत शरजील यानं हिंदू धर्मियांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादळ उठले होते. शरजीलला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केली होती.

उत्तर प्रदेशचा शरजील महाराष्ट्रात आणि पुण्यात येऊन असे वक्तव्य करतो, याचा अर्थ काय? असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षाने केला होता. तर, सत्ताधारी पक्षाने आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरजील दोषी आढळला तर, त्याला शिक्षा होईलच, असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरजीलचे पोलिस ठाण्यात हजर होणे महत्त्वाचे मानले जात आहे. 

कमालीची गुप्तता
उस्मानी हजर होण्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. उस्मानी याने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार या परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून भारतीय जनता पार्टी राज्यातील काही संघटनांनी या मुद्यावर आंदोलने करून उस्मानीच्या अटकेची मागणी केली होती. उस्मानी यावर भावना भडकावल्याप्रकरणी (भादंवि कलम 153 ए) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. या बाबत भारतीय युवा जनता मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे (28, रा. 404, अमृत गंगा सोसायटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांच्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. याच दरम्यान, उस्मानीने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून उस्मानीला स्वारगेट पोलिस ठाण्यात हजर व्हायचे होते. त्यानुसार तो बुधवारी पोलिसांसमोर हजर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com