Shasan Aplya Dari : बारामती येथे 'शासन आपल्या दारी' शिबिराचे 30 मे रोजी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shasan Aplya Dari camp will held on 30th May in baramati

Shasan Aplya Dari : बारामती येथे 'शासन आपल्या दारी' शिबिराचे 30 मे रोजी आयोजन

बारामती : बारामती तालुक्यातील 'शासन आपल्या दारी' अभियानाअंतर्गत शिबिराचे 30 मे रोजी सकाळी 11 वाजता आधिराज मंगल कार्यालय, (महालक्ष्मी शोरुमच्या शेजारी, फलटण रोड, बारामती) येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

या शिबिरात महसूल विभागांतर्गत येणारे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात/रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, जीर्ण किंवा खराब शिधापत्रिका बदलणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, सामाजिक विशेष सहाय्य योजना,

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा, दीर्घकालीन आजार, दिव्यांगासाठीच्या योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, दिव्यांगासाठी आधार कार्ड नोंदणी करणे आदी सेवा देण्यात येणार आहेत.

घरगुती नवीन वीज कनेक्शन, कोविड प्रतिबंधक लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी एस.टी. पास, दिव्यांगासाठी विविध लाभ, विवाह नोंदणी प्रमाणपत्र-अर्ज स्वीकृती, पंचायत समितीअंतर्गत विविध विभाग, कृषि, भुमी अभिलेख योजना, महावितरण, महाऊर्जा, आरोग्य, पोस्ट, वन, समिजिक वनीकरण, राज्य परिवहन महामंडळ, उप प्रादेशिक परिवहन विभाग, बँक, पशुसंवर्धन, नगरविकास, पाटबंधारे विभागाच्या योजना व सेवेचा लाभ देण्यात येणार आहे,

या शिबिरात काही लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत. नागरिकांनी, लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहनही उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

टॅग्स :Pune NewsBaramati