

तिरुअनंतपुरम (केरळ), ता. १९ (वृत्तसंस्था) ः ‘‘भारत हा बांगलादेश नाही आणि फ्रान्सही नाही. या दोन्ही देशांशी भारताची तुलना करणे मला विशेष सुसंगत वाटत नाही. फ्रान्समध्ये बस आणि पोलिस ठाण्यांना आग लावण्यासारखा जो हिंसाचार झाला, त्याचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. आमचा विश्वास केवळ शांततापूर्ण आंदोलनांवर आहे. मी स्वतः अशाच आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहे आणि विरोधी पक्षाचाही सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या आंदोलनांना पाठिंबा आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सोमवारी केले.
देशात सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांचाही थरूर यांनी इन्कार केला. विरोधी पक्षाची मागणी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारयाद्यांमधून मोठ्या संख्येने लोकांची नावे वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
‘‘सत्तापालट यांसारख्या शब्दांचा विपर्यास करण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत आहोत. सध्या मोठ्या संख्येने लोकांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आल्याची बाब चिंताजनक आहे. ही प्रक्रिया अत्यंत दोषपूर्ण, अनियमित आणि अंशतः बेकायदा आहे. त्यामुळेच आम्ही ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत आहोत. हा घटनात्मक मुद्दा आहे. सत्ताधारी सरकार उलथवून टाकण्याचा हा प्रयत्न नाही,’’ असेही थरूर यांनी प्रतिपादन केले.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार पवन खेडा यांनीही भारतातील आंदोलनांची युरोपमधील आंदोलनांशी तुलना करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.