esakal | संसारिक जबाबदारी आणि नोकरी करत तिने बारावीच्या परिक्षेत मिळवले यश
sakal

बोलून बातमी शोधा

jag.jpg

शाळा सोडल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी संसाराचा गाडा चालवत तीन..बारावीची परीक्षा दिली, आणि उत्तीर्णही झाली. मुलीचा अभ्यास घेता घेता स्वतःलाही चांगले मार्क मिळवून दाखवले.

संसारिक जबाबदारी आणि नोकरी करत तिने बारावीच्या परिक्षेत मिळवले यश

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : शाळा सोडल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी संसाराचा गाडा चालवत तीन..बारावीची परीक्षा दिली, आणि उत्तीर्णही झाली. मुलीचा अभ्यास घेता घेता स्वतःलाही चांगले मार्क मिळवून दाखवले.

थोपटेवाडी ता. बारामती येथील आशा सेविका सारिका अनिल जगताप यांनी आपले गृहिणीचे कर्तव्य पार पाडत बारावीत ६२ टक्के गुण मिळवले आहेत. दहावीच्या परिक्षेनंतर लगेच सन. १९९९ला विवाह झाला. शेतकरी कुटुंबातील संसारी जबाबदारीमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही यामुळे खचून न जाता मुलांना चांगले शिक्षण देण्याचा निर्णय घेतला मुलगी दहावीला फर्स्ट क्लास ने पास झाली पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला येथेही चांगले गुण मिळाले तिचा अभ्यास घेता घेता स्वतःचाही अभ्यास करून बाहेरून बारावीचा फॉर्म भरला आणि ६२% गुण मिळवले.

बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

सारिका थोपटेवाडीत येथे अंगणवाडी  मदतनीस व आशा सेवीका म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबीयांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे नोकरी करत कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत आहेत .  २०१९ मध्ये त्यांना  खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार मिळाला आहे.

याबरोबरच पणदरे विभागातील सर्वोत्कृष्ट आशा सेवीका पुरस्कारही सलग तीन वर्षे त्यांना मिळवला आहे. नोकरी करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळून १२ वी परीक्षेत सारिका जगताप यांनी उत्तम यश मिळविल्याने त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पती अनिल जगताप यांच्या प्रोत्साहानामुळेच मी एवढे  करू शकले आपल्या यशात पतीचा मोठा वाटा असल्याचे सारीका जगताप आवर्जुन  सांगतात.

लाॅकडाउनमध्ये रविवारपासून पुणेकरांना दिलासा

Edited by : sagar shelar