शेखर गायकवाड पुण्याचे नवे महापालिका आयुक्त; पदभार स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

आयुक्त सौरभ राव यांनी आपल्यापदाची सूत्रे गायकवाड यांच्याकडे सोपविली. "पुण्याच्या विकासाला प्राधान्य राहील,' असे गायकवाड यांनी सांगितले. 

पुणे : राज्याच्या साखर आयुक्‍तपदावरून बदली होऊन काही तासांतच पुणे महापालिकेचे नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी सकाळी पदभार स्विकारला. आयुक्त सौरभ राव यांनी आपल्यापदाची सूत्रे गायकवाड यांच्याकडे सोपविली. "पुण्याच्या विकासाला प्राधान्य राहील,' असे गायकवाड यांनी सांगितले. 

महापालिकेचा अजब कारभार; बनवेगिरी करणाऱ्यांचे ‘चांगभले’

महापालिकेतील पावणेदोन वर्षांच्या कालावधीत राव यांची बदली होऊन, त्यांच्याजागी गायकवाड यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गायकवाड यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे, आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आठवडाभरात गायकवाड यांनी महापालिकेचा 2020-21 अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळणार आहे. येत्या सोमवारी (ता. 22) ते अर्थसंकल्प मांडतील.

'येवले चहा'मध्ये भेसळ; लाल रंगाचे गुपित उघड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Gaikwad appointed as new commissioner of Pune Municipal Corporation