esakal | कौतुकास्पद! कोरोना संकटात 'शेल्टर'ने दिले 12 हजार कुटुंबांना शेल्टर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Disaster

कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करताना शेल्टरने पुण्यातील 750, कोल्हापूरमधील 850, नवी मुंबईतील 550, पनवेलमधील 150 कुटुंबांना साबण, फिनेल, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले आहे.

कौतुकास्पद! कोरोना संकटात 'शेल्टर'ने दिले 12 हजार कुटुंबांना शेल्टर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या आपत्तीमध्ये 'शेल्टर' या स्वयंसेवी संस्थेने पुणे, कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमधील सुमारे 12 हजार लोकांना मदत केली आहे. 

कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करताना शेल्टरने पुण्यातील 750, कोल्हापूरमधील 850, नवी मुंबईतील 550, पनवेलमधील 150 कुटुंबांना साबण, फिनेल, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले आहे. तसेच पुण्यातील 430 आणि मिरजमधील 20 कुटुंबांना धान्य वाटप केले आहे.

- शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!

त्यासाठी शेल्टर असोसिएटसने स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन कार्यरत केले. कोल्हापूरमधील यादवनगरमध्ये राहणाऱ्या मीना कल्लप्पा सोनटक्के म्हणाल्या, आपत्तीच्या काळात शेल्टरने नेहमीप्रमाणे गरीबांना मदत केली आहे. कोरोनासारखा विषाणू वस्तीमध्ये पसरू नये, यासाठी संस्थेने आम्हाला दिलेले किट उपयुक्त ठरले आहे.

पुणे : ग्रामीण भागात वाढलाय सापांचा वावर; सर्पदंश झाल्यास...

शेल्टरने वस्तीपातळीवरील केलेल्या सर्वेक्षणातून हाती आलेल्या माहितीचा वापर कोरोनाच्या काळात आम्हाला करता आला आणि संबंधित कुटुंबांपर्यंत आवश्यक असलेली मदत पोचविता आली, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले. शेल्टरने तयार केलेल्या झोपडपट्टी नकाशांमुळे घरांनिहाय रहिवाशांपर्यंत पोचून त्यांचा मागोवा घेणे शक्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेल्टर ही संस्था गेल्या 25 वर्षांपासून शहरी गरीबांच्या विकासासाठी कार्यरत आहे. राज्यातील 7 शहरांत संस्थेने पायाभूत सुविधांचे वस्तीनिहाय सर्वेक्षण करून 20 हजारपेक्षा जास्त वैयक्तिक स्वच्छतागृहे पुरविण्यात मदत केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप