घाबरू नका, खूनाचा छडा लवकरच लागेल

घाबरू नका, खूनाचा छडा लवकरच लागेल
Published on: 

सुपे, ता. २ : बाबुर्डी (ता. बारामती) येथील शेरेचीवाडी येथे चार दिवसांपूर्वी चोरी व दोन ज्येष्ठ महिलांच्या खुनाची घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. याविषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचा छडा लावल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
शेरेचीवाडीत मंगळवारी (ता. २९ सप्टेंबर) सोन्याच्या दागिन्यांची चोरी व दोन ज्येष्ठ महिलांचा निर्घृण खुनाची घटना घडली होती. या लडकत कुटुंबीयांची सुनेत्रा पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. घडलेल्या घटनेची नातेवाईकांकडून माहिती घेतली. उपस्थित अतिरिक्त पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्याकडून माहिती घेऊन लागलीच सूचना केल्या. दोन-तीन दिवसात अज्ञात आरोपींच्या तपासाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
आपल्या तालुक्यात ही सर्वात वाईट घटना घडली. यामुळे गावात दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात महिला कामाला जात नाहीत. मुले शाळेत जात नाही. निर्दयी पद्धतीने केलेल्या हत्येचे नेमके कारण कळत नाही. गाव अद्याप सुन्न स्थितीत असल्याची कैफियत उपस्थित महिला व गावकऱ्यांनी मांडली. त्यावर पवार म्हणाल्या, ‘कोणी घाबरू नका. गुन्ह्याचा छडा लवकरच लागेल. संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना देत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com