शेवाळेवाडी सरपंचपदी अशोक शिंदे, तर उपसरपंच पदी प्रियांका शेवाळे

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मांजरी (पुणे) : शेवाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी परिवर्तन पॅनेलचे अशोक मलका शिंदे यांची तर उपसरपंच पदी प्रियांका अमोल शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील सरपंच, उपसरपंचासह सर्वच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्याने येथे फेब्रुवारीमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये परिवर्तन पॅनेलचे दहा तर विरोधी शिवशंभो ग्रामविकास पॅनेलचा एक असे अकारा सदस्य निवडून आले होते.

सरपंच पद अनुसुचित जातीसाठी राखीव होते. त्यासाठी एकच जागा असल्याने व त्याठिकाणाहून निवडूण आलेले अशोक शिंदे यांची सरपंचपदी निवडीचे केवळ सोपस्कार राहिले होते. मात्र, उपसरपंचपदासाठी अनेक जण इच्छुक होते. पॅनेल प्रमुख विक्रम शेवाळे यांना उपसरपंच पदाचे उमेदवार जाहीर करण्याचे अधिकार सर्व सदस्यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी प्रियांका शेवाळे यांचे नाव जाहीर केले होते.

आज (ता. 6) या दोन्ही पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरपंच पासाठी अशोक शिंदे तर उपसरपंच पदासाठी प्रियांका शेवाळे असे दोनच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. राजुरकर यांनी शिंदे यांची सरपंचपदी तर शेवाळे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले.

पॅनेल प्रमुख विक्रम शेवाळे, संजय शेवाळे, भारती शेवाळे, वसंत शेवाळे, जीवन शेवाळे, रामभाऊ आक्काले, सचिन शेवाळे, राजाराम शेवाळे, अशोक शेवाळे, संदीप शेवाळे, बबन शेवाळे, नवनिर्वाचित सदस्य अश्र्विनी चोरघडे, अमोल जगताप, अमीत पवार, सुवर्णा कोद्रे, अक्षय शेवाळे, कविता मेमाणे, माधुरी शेवाळे, स्मिता अक्काले आदी यावेळी उपस्थित होते. निवडी नंतर उपस्थितांनी सरपंच उपसरपंचांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.

Web Title: shewalewadi sarpanch ashok shinde