Shikrapur News : तब्बल दोन वर्षे अनवानी राहिलेल्या वारे गुरुजींचे पायाला चंदन लावून धुतले प्रकाश महाजनांनी

दोन वर्षांपूर्वी झालेले गंभीर आरोप सहन न झाल्याने व्यतित होवून अनवानी राहिलेल्या वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील माजी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या पायाच्या वेदना शमविण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.
Dattatrat Ware and Prakash Mahajan
Dattatrat Ware and Prakash MahajanSakal

शिक्रापूर - दोन वर्षांपूर्वी झालेले गंभीर आरोप सहन न झाल्याने व्यतित होवून अनवानी राहिलेल्या वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील माजी मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या पायाच्या वेदना शमविण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. असे म्हणत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आज खास वारे यांची वाबळेवाडीत भेट घेवून त्यांच्या पायाला चंदन लावून पाय धुतले व या शिक्षकांच्या नशिबी असे येणे हे राज्याचे दुर्दैव असल्याचेही सांगितले. दरम्यान या प्रकाराने वारेही पहिल्यांदाच घुसमुटून रडले आणि संपूर्ण वाबळेवाडीकरही.

१४ जुलै २०२१ रोजी केवळ तोंडी आरोपांनी प्रकरण सुरू झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने वारे यांचे निलंबन केले होते. महानुभपव पंथाचे अनुयायी, शाकाहारी, सात्विक विचारसरणीचे वारे यांना हा प्रकार इतका खटकला की, त्यांनी त्या दिवसापासून अनवाणी राहणे सुरू केले.

काहीही संबंध नसताना या प्रकणात आर्थिक भ्रष्ट्राचाराचाही आरोप झाल्याने त्यांनी अनवानी राहण्याचा निश्चय केला व तो ते निर्दोष झाले तरीही त्यापासून ते आजही अढळ राहिलेत. याच पार्श्वभूमिवर गेल्या दोन वर्षात त्यांना झालेल्या वेदना शांत व्हाव्यात आणि एका आदर्श शिक्षकाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र असल्याचे सांगण्यासाठीच आपण इथे आल्याचे सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी स्वत:सोबत आणलेल्या चंदन, एक परात आणि पाणी यांनी वारेंच्या पायाला चंदन लावले व ते धुवून एका आदर्श गुरुची सेवा केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

प्रकाश महाजनांचे वडीलही सोबत...?

आयुष्यात गुरुंना सर्वोच्च स्थान देण्याचे संस्कार करण्याचे काम आमच्या वडीलांनी केले ते वडील माझ्या सोबत आहेत असे यावेळी महाजन म्हणाले. पण सोबत कुणीच दिसत नसताना त्यांनी लगेच त्याचा खुलासा असा केला की, माझ्या हातात जे घड्याळ आहे, ते ८० वर्षांपूर्वीचे घड्याळ असून ते वडीलांच्या हातातील घड्याळ आजही चालू स्थितीत माझ्या हातात आहे.

पर्यायाने माझे वडील या घड्याळाच्या रुपाने सोबत आहेत. दरम्यान महाजन यांच्या मुलीचा आज वाढदिवस असतानाही ते थेट मराठवाड्यातून खास वारेंच्या पुजेसाठी आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तेंव्हा संपूर्ण वाबळेवाडी गहीवरली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com