‘शिपरॉकेट’चा आयपीओ बुधवारपासून खुला

‘शिपरॉकेट’चा आयपीओ 
बुधवारपासून खुला
Published on

‘शिपरॉकेट’चा आयपीओ
बुधवारपासून खुला

मुंबई, ता. ७ : शिपरॉकेट लि. या कंपनीचा आयपीओ बुधवारी (ता. १२) खुला होत असून, शुक्रवारपर्यंत (ता. १४) बोली लावता येणार आहे. या आयपीओसाठी प्रतिशेअर ९२ ते ९७ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान १५४ शेअरसाठी आणि त्यानंतर १५४ शेअरच्या पटीत बोली लावावी लागेल. अँकर गुंतवणूकदार मंगळवारी (ता. ११) बोली लावतील.
हा आयपीओ १,६१७.४९ कोटी रुपये असून, यामध्ये ८८५.५० कोटी रुपयांचे नवे शेअर तसेच, विद्यमान भागधारकांकडून ऑफर फॉर सेलद्वारे ७३१.९९ कोटी रुपये किमतीच्या शेअर विक्रीचा समावेश आहे.

आयपीओतून मिळणारा निधी विविध प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारासाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या उदयोन्मुख व्यवसायाच्या आणि मुख्य व्यवसायाच्या विपणन उपक्रमांमध्ये गुंतवणूक; तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांसाठी आणि क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक; कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड अथवा मुदतपूर्व परतफेड तसेच सर्वसाधारण व्यावसायिक कारणांसाठीही या निधीचा वापर करण्यात येणार आहे, असे कंपनीने नमूद केले आहे. ॲक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया , जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com