

Shirdale Nature Tourism Grows as Large Peacock Flocks and Lush Greenery Attract Nature Lovers During Monsoon Season
sakal
- सुदाम बिडकर
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वेकडील डोंगररांगांमध्ये वसलेले शिरदाळे गाव पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने अक्षरशः खुलून जाते. हिरवाईची दाट चादर, दुर्मीळ वनसंपदा, पाझर तलाव आणि वन्यजीवांच्या सान्निध्यात गेल्या काही वर्षांत मोरांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ या परिसराची ओळख बनली आहे. जैवविविधतेला समृद्ध करणारे हे राष्ट्रीय पक्षी निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरत असले, तरी पेरणीनंतर पिकांवर होणाऱ्या त्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शिरदाळे परिसरात निसर्गाचा आनंद आणि शेतीची वेदना, असे दुहेरी चित्र पाहायला मिळत आहे.