शिरसाई उपसा सिंचना योजना सुरू झाली

विजय मोरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून (रविवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी भागात काही प्रमाणात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 

उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून (रविवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी भागात काही प्रमाणात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 

बारामती जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने शिरसाई योजनेतून पिण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या लाभार्थी गावातील तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती व भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याn आदेशानुसार शिरसाईच्या पाण्याचे पिण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

खडकवासला कालव्यातून शिरसाई उपसा योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी शिर्सुफळ तलावात सोडण्यात येणार आहे. त्यानुसार सद्या शिर्सुफळ तलावात 50 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाण्यातून शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्यातून दौंड तालुक्यातील भोळोबाच्यावाडीतील तलावात पाणी सोडण्यात येत आहे. तसेच बऱ्हाणपूर येथील तलावात पाणी सोडण्यात येत आहे. (टेल टू हेड) शेवटच्या गावाकडून जवळच्याकडे योजनेचे पाणी लाभार्थी 14 गावात सोडण्यात येणार आहे. या पाण्यातून संबंधित गावाला पिण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या पाझर तलावत योजनेचे पाणी सोडण्यात येणार आहे. सद्या तलावात 50 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार योजना कार्यान्वित करुन लाभार्थी संबंधित गावात पाणी सोडण्यात येत आहे. अशी माहिती शिरसाई उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता एल. जी. भोंग यांनी दिली. 

 

Web Title: Shirsai Lift irrigation scheme started