शिरसाई योजनेच्या पाण्याने मिटणार शिर्सुफळचा पाणीप्रश्न

संतोष आटोळे
शनिवार, 31 मार्च 2018

शिर्सुफळ : शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी शिर्सुफळच्या पाणीपुरवठा योजने लगत असलेल्या दत्तवाडी तलावासह गाव परिसरातील शिरसाई मंदिराशेजारी असलेल्या बंधाऱ्यामध्ये सोडण्यात आले. याचा फायदा या भागातील विहीरी, कुपनलिका यांची पाणी पातळी वाढण्यास होणार असल्याने आगामी काळामध्ये यात्रेच्या पार्श्वभूमिवर शिर्सुफळला भेडसावणारी तीव्र पाणी टंचाई थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ तलावावर असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेचे 4 मार्च पासुन आर्वतन सुरु आहे. यामध्ये तालुक्याच्या जिरायत भागातील लाभक्षेत्रातील पाणीपट्टी भरलेल्या गावांमधिल तलाव, बंधारे भरण्यात आले. याचा फायदा संबधित गावांना होणार आहे. आवर्तनाच्या अंतिम टप्प्यात शिर्सुफळ गावठाणच्या पाणी उद्भवाच्या जवळ असलेल्या दत्तवाडी तलाव तसेच शिरसाई मंदिर परिसरातील बंधाऱ्यामध्ये मध्ये ग्रामपंचायतीने पुढाकार घेत तीस हजार रुपये पाणीपट्टी भरली व या योजनेच्या माध्यमातुन पाणी सोडण्यात आल्याने पाणीसाठा झाला आहे. याचा फायदा पाणी पुरवठा योजनेच्या विहीरींसह परिसरातील विहिरी व कुपनलिका यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.

याचा फायदा 19 व 20 एप्रिल रोजी ग्रामदेवता शिरसाई देवीच्या यात्रा कालावधीत निर्मान होणारी पाणीटंचाई दुर होण्यासाठी होणार आहे.यामुळे ग्रामपंचायती पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या मधुन समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

महिलांचा हंडामार्चा.. विज कंपनी जबाबदार असल्याचा ग्रामपंचायतीचा खुलासा
एकीकडे शिरसाई योजनेच्या माध्यमातुन दत्तवाडी तलाव व शिरसाई मंदिरासमोरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आलेले असताना गेल्या काही दिवसांपासुन गावठाणातील समाजमंदिर परिसरात ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्यात अपयश आले होते.

या पार्श्वभूमिवर या भागातील महिलांनी आज (ता.31) रोजी ग्रामपंचायतीवर हंडा मार्चा काढला होता.याबाबत बोलताना सरपंच अतुल हिवरकर म्हणाले, सध्या गावामध्ये पाणीसाठ्याची टंचाई नाही मात्र विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विजपुरवठ्यात बिघाड होत आहे. यामुळे गावाला पाणीपुरवठा करण्यात अडचण येत आहे.यावर संबंधित कंपनीकडे वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने टंचाईची सामना करावा लागत आहे. यावर लवकरच मार्ग काढण्यासाठी पाठपुरवा करु.
 
Web Title: Shirsai scheme to end water supply problem in Shirsuphal