शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन पुन्हा फुटली

संरक्षक भिंत गेली वाहून
पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे उंच उडणारे फवारे
पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे उंच उडणारे फवारेSakal

शिर्सुफळ - बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने बंद झाली.यावर परतीच्या पाण्याचा दाब येऊन पाईप लाईन वरती ताण येत उपसा सिंचन गृहालगतच मंगळवार (ता.19) रोजी दुपारी फुटली. यामुळे पाणी उंच उंच उडत होते.यात लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच पंपगृहाची संरक्षक भिंत पाण्याचा दाब आल्याने वाहून गेली यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा मागील आठवड्यात शिरसाई उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली. मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उपसा सिंचन योजनेत अडचण येत होती त्यातच मंगळवार (ता.19) दुपारी अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने परत येणाऱ्या पाण्याचा पाईप लाईन वर दाब निर्माण झाला याचा परिणाम पंपगृह पासून जवळच पाईप लाईन फुटली. यावेळी खूप उंचावर पाणी उडत होते. तर सदर पाणी पुन्हा उपसा सिंचन योजनेच्या कुंडात वाहक गेले यामुळे पाणी जरी वायफट गेले नसले तरी पाण्याच्या दाबाने उपसा सिंचन योजनेची संरक्षक भिंत मात्र वाहून गेली यामध्ये मोठे नुकसान झाले. एकंदरीत शिरसाई उपसा सिंचन योजनेचे प्रशासन व वीज कंपनी यांच्या योग्य नियोजनाअभावी सदर घटना घडल्याचे बोलले जात आहे. तसेच दरवर्षी पाईपलाईन देखभाल दुरुस्तीचे रक्कम खर्ची दाखवली जाते सदर काम दर्जेदार होते का असाही प्रश्न निर्माण केला जात यामुळे आता तरी प्रशासनाने जागे होऊन यापुढे असा प्रकार होणार नाही ह्याची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com