शिर्सुफळला चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

संतोष आटोळे
शनिवार, 17 मार्च 2018

शिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सर्व उपस्थितीतांची मने जिंकली. 

शिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सर्व उपस्थितीतांची मने जिंकली. 

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची सुरवात पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदाताई खराडे, पंचायत समिती सदस्या लीलाताई गावडे, माजी जिल्हा  परिषद सदस्य आप्पासाहेब आटोळे, उपसरपंच अनुसया आटोळे यांच्या हस्ते सरस्वती पुजनाने  कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शाळेतील  इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध समाज प्रबोधनासह मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले.  यावेळी येथील मुलींनी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेते पद मिळविल्याबद्दल सर्व सहभागी खेळाडुंचा सन्मान चिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्या स्वाती सातपुते, शिवाजी झगडे, अँड.राजकिरण शिंदे, शंकर सातपुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब म्हेत्रे, उपाध्यक्ष दत्तात्रय आटोळे यांच्यासह सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक पोमणे यांनी प्रास्ताविक केले व कुंडलिक शिंदे  यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मदने सर, चौलंग सर, गावडे सर, सूर्यवंशी सर, जराड मॅडम, खोमणे मॅडम, जाधव मॅडम यांनी नियोजन केले.

Web Title: shirsufal student primary school gathering