esakal | जबरदस्त : शिरूरच्या भगत आजोबांचा 107व्या वर्षी कमालीचा फिटनेस
sakal

बोलून बातमी शोधा

गुनाट (ता. शिरूर) : भाऊसाहेब भगत ज्वारी काढताना.

आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही काळजी घेतली, तरी भेसळयुक्त आहारामुळे मानवी आरोग्याची चांगलीच हेळसांड होते. त्यामुळे ऐन तारुण्यातच तरुणांना अनेक आरोग्यविषयक आजार व समस्यांना तोंड द्यावे लागते.

जबरदस्त : शिरूरच्या भगत आजोबांचा 107व्या वर्षी कमालीचा फिटनेस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुनाट - आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही काळजी घेतली, तरी भेसळयुक्त आहारामुळे मानवी आरोग्याची चांगलीच हेळसांड होते. त्यामुळे ऐन तारुण्यातच तरुणांना अनेक आरोग्यविषयक आजार व समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, सकस आहाराच्या जोरावर ‘जुनं ते सोनं’ या उक्तीचा प्रत्यय देत गुनाट (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब भगत हे १०७ वर्षांचे आजोबा आजही भल्या पहाटे ज्वारी काढत आहेत. ते देखील नव्या जोमाने आणि थकव्याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भगत आजोबांनी राखलेला शारीरिक फिटनेस व शेतातील कष्ट सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हे आजोबा शाकाहारी आहेत. त्यांच्या कामाचा आवाका पाहून ग्रामस्थ त्यांना आदराने ‘बिगबी’ या विशेष नावाने संबोधत आहे. १९१४ साली जन्म झालेले भाऊसाहेब भगत हे आजही भल्या पहाटे उठून संपूर्ण शेताला फेरफटका मारणे, नामस्मरण करणे, जनमानसात मिसळणे, सकस आहार घेणे असा त्यांचा दिनक्रम आहे. 

चहासाठी घरात आली आणि दागिने लुटून गेली!

बैलांच्या साहाय्याने कोळपणी, पाळी घालणे, नांगर धरणे, मजुरांबरोबर काही काळ का होईना शेतकाम करणे आदी कामे ते आजही लीलया करतात. अनेकदा त्यांनी आळंदी, पंढरपूर, पिंपळनेर येथील वाऱ्या पायीच केला आहेत. त्यामुळे आजही ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णतः तंदुरुस्त असून या वयात त्यांना कोणतीही शारीरिक व्याधी नाही. आजच्या काळात जिमला जाऊन, औषधांच्या साहाय्याने शारीरिक कस वाढवण्यापेक्षा ‘सकस आहार हाच श्रेष्ठ आहार’ हे या आजोबांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस 

पूर्वीच्या काळी शारीरिक अंगमेहनतीची कामे जास्त होती. मात्र, त्याच्या साथीला सकस आहार मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. पैशांपेक्षा शरीरसंपत्ती हीच मोलाची मानली जात होती. आहारातील आमूलाग्र बदलामुळे जुनी पिढी व आजची पिढी यांच्या आरोग्यमानात जमीन आसमानाचा फरक आढळतो. पैसा व खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावण्यापेक्षा तरुणांनी आता आरोग्याच्या मागे धावणे गरजेचे आहे. 
- भाऊसाहेब भगत, शेतकरी, गुनाट.

Edited By - Prashant Patil

loading image