

shirur protestors arrested
sakal
पारगाव : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रोहन विलास बोंबे ( वय १३ वर्ष) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मागील तीन आठवड्याच्या कालावधीत याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकूण तीन जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रविवार (दि.२) रोजी पोंदेवाडी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत रोडेवाडीफाटा येथे सायं ६.३० ते सोमवार दि. ३ मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेगाव व शिरूर तालुक्यातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.