कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विमा संरक्षण; शिरुर बाजार समिती ठरली राज्यात पहिली!

Shirur_Bazar_Samiti
Shirur_Bazar_Samiti

शिक्रापूर (पुणे) : कोरोनाच्या उपचारार्थ आणि कुठल्याही अपघाताच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या (Shirur Bazar Samiti) सर्व कायम कर्मचारी, तसेच सर्व रोजंदारी-स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि हमालांना प्रत्येकी दोन लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शिरुर बाजार समितीच्यावतीने नुकताच घेण्यात आला. असा निर्णय घेणारी शिरुर कृषी उप्तन्न बाजार समिती ही राज्यातील पहिलीच बाजार समिती असल्याचा दावा सभापती शंकर जांभळकर यांनी केला असून या निर्णयात सर्व संचालकांचे पाठबळ महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोरोनासह आरोग्य विमा कवच ही कल्पना सभापतीपदी महिनाभरापूर्वी विराजमान झालेले शंकर जांभळकर यांनी सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत मांडली. महिनाभरापूर्वी पिंपळे-जगताप उपबाजारातील दोन आडत्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण उपबाजार तब्बल चौदा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्यामुळे संस्था आणि एकूणच कारभारावर मोठा परिणाम झाला होता. याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या सर्व कायम कर्मचारी-अधिकारी तसेच सर्व रोजंदारी-स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि हमालांना विमा कवच देण्याबाबत जांभळकर यांनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण संचालक मंडळाने त्यांना या निर्णयासाठी पाठबळ दिल्याने सदर निर्णय झाला असून एकूण ४७ अधिकारी-कर्मचारी यांना सदर विमा कवच तात्काळ सुरू करीत असल्याचे जांभळकर आणि उपसभापती विकास आबा शिवले यांनी सांगितले. 

१0 हजारांचा प्रीमिअम अडीच हजारांपर्यंत
वरील दोन लाखांच्या कोरोना-अपघात विमा कवचाचा वैयक्तिक प्रीमिअम साधारण आठ ते दहा हजारांपर्यंत जातो. मात्र, हे सर्व ग्रुपसाठी केल्याने मनिपाल-सिगना कंपनीने हा प्रीमिअम प्रती व्यक्ती अडीच हजारांपर्यंत कमी केला असून विमा कवच तात्काळ लागू करीत असल्याचेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आल्याची माहिती जांभळकर आणि उपसभापती शिवले यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com