
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात, बैलगाडा मालकांची मागणी
शिरूर : बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात, या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालकांनी आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. शर्यतीचे बैल, घोड्यांसह वाजंत्रीच्या तालात काढलेल्या या मोर्चात बैलगाडा शौकीन व शेतकरी सहभागी झाले होते.
भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, भाजपचे तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, तुळशीदास दुंडे, हर्षद जाधव, केशव पाचर्णे, सावित्राशेठ थोरात, प्रमोद दंडवते, दिनेश राऊत, नीलेश नवले, संदीप ढमढेरे या पदाधिकाऱ्यांसह नीलेश भोर, अक्षय शिंदे, संभाजी रणदिवे, अनिल नवले, विशाल खरपुडे, संग्राम ढोकले, रवी शेळके, मयुर गवारे, विजय शिंदे, हर्षवर्धन काळभोर, वसंत लंघे, लक्ष्मण गवारे, पप्पू शिळमकर, नितीन गव्हाणे, डॉ. भीमराव लंघे, विजय नरके, नवनाथ जाधव, भवनाथ भुजबळ, अक्षय ढमढेरे, संतोष साकोरे, स्वप्निल वाळूंज, गोरक्ष पोळ, बाळा भोर, हनुमंत लंघे, दिगंबर लंघे, पंकज धुमाळ, विशाल वाळुंज, बाबूराव वाळुंज हे कार्यकर्ते व गाडामालक यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: भाडेकरू ठेवताय...सावधान ! पोलिस स्टेशनला नोंद बंधनकारक
तहसिलदार कार्यालयाच्या परिसरात वाजंत्रीच्या गजरात शर्यतीच्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत बैलगाड्यांच्या पुढे पळणारे घोडेही संबंधित मालक घेऊन आले होते. 'यळकोट यळकोट जय मल्हार' च्या गजरात यावेळी भंडा-याची मुक्त उधळण करण्यात आली. तहसिलदार लैला शेख यांना गाडामालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत राज्य शासन चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
"२४ सप्टेंबर पर्यंत बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. मंत्री सुनिल केदार यांनीही तसे आश्वासन दिले होते. परंतू हे आश्वासन हवेतच विरले आहे. आता राज्य शासनाने शेतकरी व गाडामालकांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता तातडीने कार्यवाही करावी. येत्या १५ दिवसांत शर्यती सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. बैलगाडामालकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी."- जयेश शिंदे,अध्यक्ष, भाजप कामगार आघाडी, पुणे जिल्हा
Web Title: Shirur Bullock Cart Race Should Be Resumed Bullock Cart Owners Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..