शिरूर-हवेलीचा आमदार भाजपचाच असेल : भेगडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

"विधानसभा निवडणुकीनंतर शिरूरचा पुढचा आमदार भाजपचाच असेल, फक्त मताधिक्‍यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून झटून काम करावे,'' असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. 

न्हावरे (पुणे)  : "विधानसभा निवडणुकीनंतर शिरूरचा पुढचा आमदार भाजपचाच असेल, फक्त मताधिक्‍यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून झटून काम करावे,'' असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. 

भेगडे यांनी शिरूर तालुक्‍यातीच्या पूर्व भागातील नागरगाव, न्हावरे येथे गावभेट दौरा केला. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबदल न्हावरे ग्रामस्थांतर्फे भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. भेगडे म्हणाले, ""देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा झझांवत सुरू आहे. त्याचप्रमाणे शिरूर हवेली मतदारसंघात आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या सततच्या शासनदरबारी पाठपुराव्यामुळे तीन हजार कोटी रुपयांची विकासकामे कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील तळागाळातील सर्वसामान्य जनता राज्यातील सत्ताधारी व तालुक्‍यातील विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांच्याविषयी सकारात्मक आहेत. येत्या निवडणुकीत शिरूर हवेलीचा आमदार भाजपचाच असेल. मात्र कार्यकर्त्यांनो गाफील राहू नका.'' 

याप्रसंगी आमदार बाबूराव पाचर्णे, भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दादापाटील फराटे, उपाध्यक्ष सुभाष कांडगे, तालुकाध्यक्ष भगवान शेळके, युवकचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, उपाध्यक्ष दिनेश दरेकर, शहाजी जाधव, अरुण तांबे, दिपक कोकडे, नितीन खंडागळे, नागेश निंबाळकर, शहाजी निंबाळकर, किसन बिडगर, किरण नवले, दत्तोबा शेंडगे, संजय शेळके उपस्थित होते. यावेळेस जिल्हाध्यक्ष भेगडे यांनी समस्या जाणून घेतल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur-Haveli MLA will belong to BJP