

Leopard Attack Kills Elderly Woman, Sparks Community Outrage.
Sakal
टाकळी : शिरूर तालुक्यातील जांबुत (ता. शिरूर, जि. पुणे) येथे बुधवारी पहाटे बिबट्यांच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७०) या महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बेल्हे–जेजुरी रस्त्यावर पंचतळे (जांबुत) येथे रास्ता रोको आंदोलन करत बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त न झाल्यास अंत्यविधी न करण्याचा इशारा दिला.